Posts

भ्रम

पहाटे पहाटे करीम बाजल्यावरून उठला. घराच्या आत झोपण्यापेक्षा त्याला घरच्या गच्चीवर मोकळ्या हवेत झोपायला आवडायचं. सूर्याच्या पहिल्या किरणांनी वाळूवर रेघा मारायला सुरुवात केली कि त्याला आपसूक जाग यायची. त्यानंतर तो थोडा वेळ गच्चीवरच हात-पाय पसरून शरीराचे स्नायू मोकळे करून घ्यायचा. गच्चीवरून खाली उतरून त्याने हात-तोंड धुतलं आणि चबुतऱ्यावर बैठक मारली. सवयीप्रमाणे त्याने डोक्याला मुंडासं बांधलं आणि अंगावर बंडी चढवली. कमरेची लुंगी त्याने बदलली आणि शेवटी अंगावर गुढघ्याच्या जरा खाली जाणारा अंगरखा घातला. सूर्य आता क्षितीजाच्या रेघेपासून वर आला होता आणि सवयीप्रमाणे आग ओकायची तयारी करायला लागला होता. घरचे बाकीचे लोक हळू हळू सकाळची आन्हिकं उरकायला लागले होते.  बायकांनी कोळसे घालून चूल पेटवली आणि खापरीवर खारवलेले मासे भाजायला घेतले . उंटिणीचं दूध, मासे, खजूर अशी छान न्याहारी आल्यावर सगळे जण हातात मातीच्या थाळ्या घेऊन उकिडवे बसले आणि आपापला वाटा खायला सुरु केला. थोड्याच वेळात अब्रा ( अरबी पद्धतीची लाकडी होडी ) पाण्यात सोडून ते ४-५ पुरुष समुद्रात जाणार होते. त्यातले अनुभवी असलेले करीम, नसीम...

प्रस्तावना

राबता  शुक्री आपल्या छोट्याशा दुकानात आपल्या चार-पाच मदतनीसांबरोबर चिंताक्रान्त अवस्थेत बसलेला होत. बरेच दिवस काही नवं काम नं मिळाल्यामुळे त्याच्याकडची पुंजी आता संपायच्या मार्गावर आलेली होती. मदतनिसांना महिन्याची तन्ख्वाह दिल्यावर त्याच्या गल्ल्यात जेमतेम एक-दोन आठवडे पुरतील इतकेच पैसे उरणार होते. वृद्ध अम्मी - अब्बा, तीन मुलं, सहा महिन्याची गर्भवती असलेली बायको आणि घरकामासाठी नेमलेली रशिदा नावाची मदतनीस अशा मोठ्या कुटुंबकबिल्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती. काही वर्षांपासून त्याने गावाच्या मुख्य बाजारात इमारतींच्या दुरुस्तीचं आणि देखरेखीचं काम करायचं दुकानं थाटलं होतं. पहिली काही वर्षं त्याला आजूबाजूच्या गावातूनही चांगला प्रतिसाद मिळाला होता, पण हळू हळू त्याच्यासारखे अनेक जण या उद्योगात पडले आणि स्पर्धा वाढून या धंद्याला एकूणच उतरती कळा आली. आता जवळ जवळ दोन-अडीच महिने नवं काम न मिळाल्यामुळे त्याची अवस्था बिकट झाली होती.  " भाईजान, चिंता मतं किजीये...हम और इंतेजार करते है....जितनं पैसे है मिल बाट के चला लेंगे..." दुकानातला वाहिद आपल्या मालकाला धीर देत होता. बाकीच्यांनी...