Posts

Showing posts from February, 2020

मृगजळ

अब्दुल झपझप पावलं टाकत वाळू तुडवत आपल्या गावाकडे चालला होता. गाव बराच लांब होतं. ज्या रस्त्याने आपण गावाकडे चाललोय, त्या रस्त्यावर गाव यायच्या आधी कब्रिस्तान आहे आणि त्या कब्रिस्तानाच्या बाजूने जाणाऱ्या कोणत्याही जिवंत माणसाला सूर्यास्तानंतर कब्रिस्तानातले सैतान पकडतात आणि आपली रक्ताची तहान भागवून कब्रिस्तानबाहेर फेकून देतात अशी त्याच्या गावात अनेक वर्षांपासून लोकांना ऐकिवात असलेली दंतकथा त्याच्या मनात रेंगाळत होती. गावापासून चाळीस मैलांवर असलेल्या बाजारात तो आपला माल विकायला पहाटेच गेला होता. घरच्या मेंढ्यांची तांबूस करडी लोकर आणि बायकोने तयार केलेल्या मासे साठवायचा टोपल्या दर आठवड्याला नित्यनेमाने एक दिवसाआड बाजारात न्यायच्या, विकायच्या आणि त्या पैशातून बाजारातूनच खायचं प्यायचं जिन्नस घेऊन घरी यायचं हे अगदी ठरल्याप्रमाणे व्हायचा आणि आजही झालं. फक्त बाजारातून निघायला उशीर झाल्यामुळे उन्हं कलली तरी तो गावाच्या वेशीपासून बराच लांब होता. दूरवरून मशिदीची माघरीबच्या नमाजाची बांग त्याला ऐकू आली. सूर्यास्त होऊन आता आसमंतात मंद लालसर प्रकाश पसरलेला दिसत होतं आणि हळू हळू तोही कमी कमी होत काळ

पाताळभैरव

सुरा हे वाळवंटातल्या गोड्या पाण्याच्या झऱ्याकाठी ऐसपैस पहुडलेलं एक सुखवस्तू गाव होतं. गावात मोजकेच लोक असले, तरी ते सगळे गुण्यागोविंदाने राहात होत. गावात कोणीही एकमेकांशी भांडण करणं, मारामार्या करणं असले प्रकार करत नसत. दार आठवड्याला शुक्रवारी जिरगा ( पंचायत ) जमवून सगळ्या तक्रारींचा निवाडा व्हायचा आणि दोन्ही बाजू ऐकून मौलवी, पंच आणि गावातले ज्येष्ठ हे सगळं कामकाज चालवायचे. ओमार या गावात जन्माला आला, वाढला आणि तिथेच त्याचं कुटुंबदेखील वाढलं. त्या गावची संस्कृती अशी होती, की कोणीही कोणालाही मदतीला नाही म्हणत नसे. या ओमारकडे सुद्धा असाच एके दिवशी कोणीतरी वाटसरू आला . "आपण मक्केला जात आहोत आणि निवाऱ्यासाठी जागा शोधत आहोत "या त्याच्या बोलण्यामुळे ओमार  त्याची मदत करायला तयार झाला. त्याने त्याला आपल्याच घराच्या एका खोलीत छान जागा करून दिली आणि नीट खाऊ-पिऊ घातलं. दुसऱ्या दिवशी आपल्या वाटेवर जायला निघाल्यावर त्या वाटसरूला ओमारने २-३ दिवस पुरेल इतकं खाण्याचा जिन्नस बांधून आणि पाणी पखालीत भरून दिलं. तो वाटसरू त्या आदरातिथ्याने भारावला आणि त्याने ओमारला विचारलं," तू माझी इतकी बड

असंगाशी संग

अब्दुल्ला आणि त्याची बायको एका छोट्याशा पडक्या घरात कसेबसे दिवस कंठत होते. घरात दोन वेळच्या खायची पंचाईत होती. दिवसभर गावात राब राब राबून ते शेवटी जे मिळेल ते एकत्र करून कसंबसं पोट भरायचे. मुलं नसल्यामुळे अक्खा गाव ' वांझोटी ' म्हणत असलं , तरी अब्दुल्लाचं त्याच्या बायकोवर प्रचंड प्रेम होतं. गावात श्रीमंत लोक भरपूर होते आणि त्यांच्याकडे कामं करायला त्यांनी लांबवरून कोणाकोणाला गुलाम म्हणून विकत आणलं होतं. अब्दुल्ला अशाच एका गुलामांच्या तांड्यासोबत गावात आलेला होता आणि त्याला इतर गुलामांबरोबर गावाच्या वेशीबाहेर खास त्यांच्यासाठी तयार केलेल्या तोडक्यामोडक्या घरांपैकी एका घरात जागा मिळाली होती. त्याची बायकोसुद्धा गुलाम होती आणि गावात अनेक घरात पडेल ते कामं करत ती नवऱ्याला आपल्या परीने हातभार लावत होती. गावातले श्रीमंत लोक या गुलामांना अतिशय वाईट वागणूक देत असत. सगळे गुलाम दिवस दिवसभर राबून थकून जात , पण उरलेलं अन्न आणि महिन्यातून एकदा एक कपड्यांचा जोड