Posts

Showing posts from March, 2020

रक्तसमंध

" हे घे , माझ्या शरीरातून बाहेर पडणारं उष्ण रक्त तुझी तहान भागवायला पुरेसं असेल , तर हे घे ..." हाशिम आपल्या हातावर धारदार सुरीच्या पात्याने जखमा करत ओरडला . त्या भयाण स्मशानात आजूबाजूला काहीही दिसत नसलं , तरी अदृश्य रूपात का होईना , तिथे रक्तसंमंध आहे आणि त्याची तहान मनुष्याच्या रक्ताशिवाय कशानेच भागात नाही हे त्याला माहित होत . प्रत्येक अमावास्येच्या रात्री तो असाच गावाबाहेरच्या त्या कब्रिस्तानात यायचा . इथे लोक दिवसासुद्धा पाऊल ठेवायला घाबरायचे . गावातलं कोणी गेलं तरच मंडळी इथे यायची . लहान मुलं , स्त्रिया आणि जनावरांना तर इथे आणायला सक्त मनाई होती . या कब्रिस्तानात एक रक्तपिशाच्च राहतं आणि तिन्हीसांजेनंतर सकाळचं तांबडं फुटेपर्यंत आपली रक्ताची तहान भागवायला कब्रस्तानाच्या वेशीच्या आजूबाजूला एखाद्या जिवंत मनुष्याला अथवा जनावराला शोधत असतं अशी गावात वदंता होती . हाशिम तेव्हढा एकटा या सगळ्याला ना जुमानता प्रत्येक अमावास्येला कब्रिस्तानात यायचा . त्याला गूढविद्या ,