Posts

Showing posts from June, 2020

मुहारीब

अहमद आणि त्याचे खास सरदार अहमदच्या मातीच्या गढीमध्ये मुख्य खलबतखान्यात एकत्र जमले होते. अडीचशे-तीनशे कुटुंबांची ती टोळी अरबस्तानाच्या एका मोठ्या ओऍसिसच्या आजूबाजूला ऐसपैस पसरलेल्या सालेम गावामध्ये सुखाने राहत असली, तरी आजूबाजूच्या अनेक छोट्या मोठ्या टोळ्यांनी त्यांना हैराण करून सोडलं होतं. गोड्या पाण्याचा भाला मोठा स्रोत, खजूर, ऑलिव्ह, अंजीर, डाळिंब अशा अनेक फळांच्या बागा, बारमाही पाणी असल्यामुळे पिकू शकणारे भाज्यांचे मळे आणि दूधदुभत्यामुळे आलेली समृद्धी यामुळे ते गाव आसपासच्या अनेक टोळ्यांना आपल्या आधिपत्याखाली आलेलं हवं होतं. गावात वर्षानुवर्षे चालत आलेली कलेची परंपरासुद्धा इतकी समृद्ध होती, की तिथे तयार होणारे गालिचे, चटया, चित्रं आणि लाकडी खेळणी दूरदूरच्या बाजारात विक्रीसाठी जात होती. गावाची सुसज्ज फौज जरी नसली, तरी या गावावर चालून आलेली कोणतीही टोळी कधीही पुन्हा दिसली नाही, अशी त्या परिसरात आख्यायिका होती.  अहमदला आज आपल्या खलबतखान्यात एका महत्वाच्या विषयावर आपल्या मुख्य सरदारांना सावध करायचं होतं. गावापासून काही अंतरावर खलिसी टोळीच्या लोकांनी बाजारातून चाळीस उमदे घोडे खरेदीची केल

अक्स

सुलतान इब्राहिम आपल्या खाजगी दालनात अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता. त्याच्या समोर एका भल्यामोठ्या लाकडी मेजावर बकऱ्याच्या कातड्यावर रेखाटलेला खेदिरा प्रांताचा नकाशा होता. त्या नकाशावर त्या प्रांताच्या अमीराच्या हवेलीची जागा इब्राहिमच्या डोळ्यात खुपत होती. अरबस्तानाच्या तेवीस प्रांतांच्या अमीरांनी आपल्या सगळ्यात मोठ्या मुलीचा निकाह इब्राहीमशी लावून दिल्यामुळे अर्धा अरबस्तान त्याच्या पोलादी मुठीत आलेला होता. सोयरीक जोडून त्याने सगळ्या अमीरांना आपलं अंकित करून घेतलं होतं. त्या नकाशावर एकएक करून जोडल्या गेलेल्या प्रांतांवर सुलतानाने आपल्या साम्राज्याचं चिन्ह उमटवून नकाशा व्यापून टाकला होता....पण एक छोट्या आकाराचा खेदिरा प्रांत तेव्हढा त्याच्या हातात अजून येत नव्हता.  इतर प्रांतांप्रमाणे या प्रांतावर कोणत्याही पुरुषाचा अंमल नव्हता. त्या प्रांताची राज्यकर्ती यास्मिन नावाची एक स्त्री होती. तिच्या तैलचित्रांवरून आणि ज्या ज्या भाग्यवान लोकांनी तिचा दीदार केलेला होता, त्यांच्या स्तुतीवरून इतका स्पष्ट होतं होतं की अरबस्तानात तिची ख्याती एक लावण्यवती, पराक्रमी आणि खंबीर स्त्री-प्रशासक अशी होती. ति